अत्याधुनिक पद्धतीचे फर्निचर

घर सहजासहजी बदलता येत नसले तरी घराच्या बदलत्या सजावटीमुळे घराचा चेहरामोहरा बदलता येणे सहजशक्य आहे. ही कल्पना अलीकडे सर्वत्रच म्हणजे खेडे असो की शहर या ठिकाणी वापरली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याकडे फर्निचर असायला हवे, असे वाटू लागले आहे. घर छोटे असो वा मोठे, मग फर्निचर आलेच. गरजेपुरते सोयीनुसार ते बनवून घेतले जाते. खुर्ची आणि टेबल ही सर्वाची गरज आहे. टीव्हीसाठी स्वतंत्र टेबल किंवा कपाट या रूपाने त्याचा वापर सर्वाना गरजेचा झाला आहे. परंपरागत पद्धतीच्या फर्निचरला आता फाटा देऊन आकर्षक फर्निचरकडे सर्वाचा ओढा वाढला आहे. फर्निचरमध्ये नवनवीन संकल्पना आल्या, नवीन डिझाईन आणि वापरण्यास सोयीचे असे फर्निचर आता बाजारात उपलब्ध होऊ लागले आहे. जग ही एक बाजारपेठ झाली आहे. या बाजारपेठेत आता प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचा विचार करून प्रत्येक व्यवसायाने परंपरागत पद्धतीला फाटा देऊन नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्याची गरज निर्माण झाली असल्याचे चित्र आता खरेदीदाराच्या मागणीवरून स्पष्ट होऊ लागले आहे.
कार्यालय असो की, छोटे दुकान असो, त्या ठिकाणी आता अत्याधुनिक पद्धतीचे फर्निचर गरजेचे झाले आहे. मागणी तसा पुरवठा हे तंत्र व्यावसायिकांनी अवलंबिले आहे. बाजारपेठेत घराच्या सजावटीमध्ये परंपरागत फर्निचरला फाटा देऊन अत्याधुनिक फर्निचरचे आकर्षण वाढत आहे. ते सर्वाना सोयीचेही झाले आहे. या फर्निचरमध्ये परदेशी बनावटीसह भारतीय बनावटीच्या फर्निचरलाही मागणी वाढत आहे. तयार फर्निचरपेक्षा उपलब्ध जागेनुसार हवे तसे फर्निचर बनवून घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.
आपल्या घरातील फर्निचर आकर्षक असायलाच हवे, त्याशिवाय इतरांपेक्षा वेगळे कसे असेल यासाठी प्रत्येकाचा वेगळा

 

विचार असतो. या फर्निचरमध्ये आता लाकडाला पर्याय म्हणून प्लायवूड आले. त्यालाही पर्याय आता एम.डी.एफ. (मीडियम डेन्सिटी फायबर बोर्ड), पार्टिकल बोर्ड, प्री लॅमिनेटेट बोर्ड यांचा वापर केला जात आहे. सध्या परदेशी बनावटीच्या फर्निचरला कार्यालय आणि घरासाठी मोठी मागणी आहे. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांची विशेष मागणी आहे. सुटसुटीत आणि आकर्षक फर्निचर आपल्याकडे असावे ही प्रत्येकाची धारणा असते. ग्राहकाची ही गरज ओळखूनच आता मॉल संस्कृतीने हा बदल स्वीकारला आहे.
कार्यालय असो की घर असो, येथे खुच्र्या आणि टेबल आलेच. दर्जेदार फर्निचर खरेदी करण्यासाठी आता बाजारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. एकेकाळी फर्निचर बनविण्यासाठी कारागीर पाहायला लागायचे. त्यासाठी वेळ खर्च व्हायचा आणि मनासारखे फर्निचर झाले नाही की मनस्ताप ठरलेला! आता या सर्व गोष्टींना मॉल संस्कृतीने फाटा दिला आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आकर्षक फर्निचर तयार स्वरूपात विक्रीसाठी ठेवले आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसायासाठी फर्निचर बनवून घेण्याचा कल आहे, तर आयटी क्षेत्र आणि घरगुती फर्निचरसाठी तयार फर्निचरला मागणी वाढत असल्याचा अनुभव आहे.

घरामध्ये वापरण्यासाठी आजही जास्तीत जास्त लोकांना फर्निचर बनवून घेण्याकडे कल आहे. व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्यामुळे ठराविक कलाकारांकडूनच केले जाणारे फर्निचर आता अत्याधुनिक आणि कलाकुसर करणाऱ्या कारागिरांकडून बनवून घेतले जात आहे. यासाठी आर्किटेक्चरचीही मदत घेतली जाते. फ्लोअरिंग, भिंती, सिलिंग यांच्या सजावटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मिनरल फायबर बोर्ड आणि पीओपीचा वापर करून सिलिंगचा आकर्षकपणा वाढवला जात आहे.
फर्निचरबरोबर आता घरामध्ये जास्तीत जास्त प्रकाश राहील याची काळजी घेतली जाते. फर्निचरचे अत्याधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा प्रशिक्षण केंद्रे नाहीत. आय.टी.आय.मध्ये सुतारकामाचे प्रशिक्षण दिले जाते.
पूर्वी सुताराकडूनच फर्निचर केले जायचे. आता प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे. आपल्याकडे अजूनही जास्तीत फर्निचर बनवून घेण्याचा आग्रह धरला जातो,

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s