आकर्षक देखणे किचन

पारंपरिक पद्धतीच्या स्वयंपाकघरामध्ये बदल होऊन आता त्याचे रूपांतर किचनरूममध्ये होऊनही आता बराच काळ लोटला. किचन ट्रॉलींमुळे किचनचे स्वरूप बदलले. बहुतांश गृहिणी आता नोकरी-व्यवसाय करू लागल्यामुळे वेळ वाया न जाता हव्या असणाऱ्या वस्तू चटकन मिळतील, अशा पद्धतीने ठेवण्याची व्यवस्था या किचन ट्रॉलीमध्ये केलेली असते. त्यामुळे ते अधिक सोयीचे वाटू लागले आहे. यासाठी अत्याधुनिक पद्धतीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कमी जागेमध्ये देखणे, आकर्षक किचन असावे असे प्रत्येक गृहिणीला वाटते.
किचनसाठी जागा किती आहे यापेक्षा ते कशा पद्धतीने बनवले आहे, त्याची कल्पकता कशी आहे, त्याच्या आकारापेक्षा त्याची सजावट आणि मांडणी कशी आकर्षक केली आहे याकडे सर्वाचे लक्ष असते. अशा तऱ्हेने स्वयंपाकघरापासूनचा प्रवास आता किचनपर्यंत आला आहे. स्वयंपाकघराऐवजी आता सर्रास किचनरूम म्हणूनच संबोधले जाते. हल्लीच्या जमान्यामध्ये सजावटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. खास किचनचे साहित्य देणारी, त्याची फिटिंग करून देणारी दुकाने मॉलमध्ये आहेत. किचनची निवड करण्यापासून ते अगदी फिटिंग करून देण्यापर्यंतची सेवा या दुकानांमधून दिली जात आहे. त्यामुळे हल्ली आकर्षक देखणे किचन बनवण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे.
प्रामुख्याने किचन हे वर्किंग ट्रँगल या डिझाईनमध्ये केलेले असावे. यामध्ये प्रामुख्याने फ्रिज, सिंक व शेगडी या एकमेकांशी निगडित वस्तूंचा वापर सहजतेने करण्याएवढय़ा अंतरावर असावे. यामध्ये दोन भाग केले जातात. ते वेट एरिया व ड्राय एरिया. वेट एरियामध्ये फ्रीजजवळ सिंक व त्याच्याजवळ त्याच्याशी निगडित असलेल्या वस्तूंचे स्टोअरेज (डिटर्जंट डस्टबीन, कप सॉसर, डिश, गार्बेज

क्रशर) अशा प्रकारचा विचार केला जातो. ड्राय एरियामध्ये आपणास विविध प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिक कोटेड, कप-सॉसर, डिश होल्डर, नाईफ होल्डर, स्पाइस रॅक, थाळी ड्रॉवर, पूल आऊट, कॉर्नरसाठी करोझल डी युनिट, मॅजिक कॉर्नर, ट्विन कॉर्न युनिट, मोंडो युनिट, प्रोआर्क करोझल अशी विविध प्रकारची युनिट्स मिळतात. हेवी व्हेसलसाठी व डब्यांसाठी प्लेन ड्रॉवर, ग्रेन ट्रॉली, मेटा बॉक्स, टॅडम बॉक्स, पार्टिशन ड्रॉवर्स, लाकडी ड्रॉवर्स असे गॅलरीजचे असंख्य प्रकार आहेत.
या शिवाय किचनमध्ये एक्स्ट्रॉ स्टोअरेजसाठी टॉल युनिट, लँडर युनिट, टँबोर युनिट, पेंट्री युनिट, एलिप्स कॉर्नर युनिट्से प्रकार उपलब्ध आहेत.
या किचनमध्ये वापरण्यात आलेले दरवाजे अत्यंत महत्त्वाचे असतात. एमडीएफ-पीव्हीसी लॅमिनेटेड, फोरमायका लॅमिनेटेड, मेटॅलिक पेंटेड असे विविध प्रकार उपलब्ध आहेत, तर मरिन प्लाय, सॉलिड वूड, प्रोफाइल डोअर यांसारखेसुद्धा प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. किचनच्या वॉल टाइल्स, फ्लोअरिंग टाइल्स, ग्रॅनाइट व रूमचा रंग, अंतर्गत सजावट या सर्वाचा एकमेकांशी संबंध लक्षात घेऊनच किचनच्या दरवाजाची व रंगाची निवड केल्यास किचनला चांगला लूक प्राप्त होतो. त्यामुळे किचनमध्ये प्रसन्न वातावरण निर्मितीही होते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s