घराचे डिझाईन वा अंतर्गत सजावट by www.designaddict.us

आपल्या नव्या वा नूतनीकरण केलेल्या घराचे डिझाईन वा अंतर्गत सजावट सौंदर्यपूर्ण करण्यासाठी थोडीशी कल्पकता वापरली की त्यातून मिळणारे परिणाम अधिक आनंदाभूती देते. खरं म्हटलं तर, घरमालकासाठी ते एक आव्हान असते. खऱ्या अर्थाने डिझायनर घराची निर्मिती म्हणजे केवळ आकर्षक रंगसंगती वा घरात शोभेच्या वस्तूंची गर्दी करणे नव्हे, तर अशा अंतर्गत सजावटीतून घरमालकाचं व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित व्हायला हवे. कम्फर्ट आणि स्टाईल याचा योग्य समन्वय त्यातून प्रतित व्हायला हवा. सध्या कोणता ट्रेन्ड प्रचलित आहे याच्या काही टिप्स देत आहोत.
किमान वस्तू – उच्च प्रतिचे फर्निचर वापरण्याकडे आजकाल कल वाढला आहे. फर्निचर उच्च प्रतिचे असावे तसेच ते गरजेपुरतेच असावे, फर्निचरचा पसारा होता कामा नये याची काळजी घ्यावी. गरज नसलेल्या सजावटीच्या वस्तू, आहे जागा म्हणून घरात ठेवणे, भिंतींवर लटकवणे कटाक्षाने टाळावे.
भडक रंगसंगती टाळा – घराच्या भिंतींना भडक रंग देऊन खुलविण्याचा ट्रेन्ड आता जवळजवळ नामशेष झाला आहे. सध्याच्या जमान्यात जिवंत वा उठावदार दिसेल अशा रंगसंगतीकडे कल दिसून येतो. उदा. इलेक्ट्रिक ब्लू, ब्राईट आर्चर येलो याणि पर्पल रंगछटा असलेल्या भिंती अधिक खुलतात. परस्परविरोधी रंगछटांद्वारे तुम्ही भिंतींचे सौंदर्य अधिक खुलवू शकता.

   

काचांचा परिणाम साधा – घरात एखाद्या निवडक ठिकाणी मोठी काच बसवली तर उपलब्ध जागा अधिक मोठी दिसायला मदत होईल, शिवाय त्या काचेचा वेगळ्याने उपयोगही करता येईल. आजकाल बाजारात काचांचे डिझाईन अनेकविध प्रकारात उपलब्ध आहे. या काचेच्या मागे प्रकाशझोत सोडला तर त्याचे सौंदर्य अधिक खुलते. त्यासाठी स्टेन्ड ग्लास हा प्रकार लोकप्रिय झाला आहे.
एकसंध फ्लोअरिंग – जोडविरहित वा एकसंध फ्लोअरिंग असले की ते स्वच्छ तर राहतेच, शिवाय दिसतेही कलासिक. फ्लोअरिंग करताना इपॉक्सी किंवा मॉझल वापरुन एकसंधता आणता येते. हे मटेरिअल वापरणे शक्य नसेल तर मोठय़ा आकाराच्या टाईल्स किंवा मार्बल वा ग्रॅनाईटच्या मोठय़ा स्लॅब्स वापरता येतील. नैसर्गिक साधनसामग्री – अशी साधनसामग्री वापरून तुम्ही तुमचे घर ‘इको फ्रेंडली’ करू शकता. उदा. फर्निचरसाठी बायसन वा एमडीएफ बोर्ड्स किंवा नॅचरल व्हिनिअर्सचा उपयोग फोरमायका वा सनमायकाऐवजी करता येईल. अशा प्रकारच्या नैसर्गिक साधनसामग्रीला सध्या मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. फर्निचरमध्ये लेदर पॅच, कोर्क, तांबे याचा उपयोग केल्यास असे फर्निचर दिसायला आकर्षक तर दिसतेच परंतु त्याचा टिकाऊपणाही अनेक पटींनी वाढतो.
प्रकाशयोजना – विजेचे दिवे कोठे लावायचे, त्यामध्ये किती अंतर ठेवायचे, टय़ूबलाईट्स लावायच्या की साधे दिवे लावायचे? हेही विचारपूर्वक ठरवावे लागते. आजकाल प्रखर प्रकाशयोजना करण्याचा कल मागे पडू लागला आहे. आपल्याला हव्या त्या ठिकाणी ,हवा तितकाच प्रकाश पसरवणे त्यासाठी स्लॅबमध्ये वा पिओपी प्लॅस्टमध्ये दिवे बसवणे याला पसंती मिळत आहे. अ‍ॅक्सेसरीज – सध्या डिझायनर वा ब्रान्डेड वस्तू वापरण्यकडे कल दिसून येतो. भिंतीवर एखाद्याच पण चटकन लक्ष वेधून घेणारा वॉलपीस लावला तर ती भिंत उठावदार तर दिसतेच; शिवाय तुमच्या घराला वेगळाच स्पार्क देते. अशीच मांडणी इतर वस्तूंच्या बाबतीतही करता येईल. पाहा तुम्हाला कायकाय शक्य आहे ते?

www.designaddict.us

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s