पडदे

नवीन घराचा शोध पूर्ण झाल्यावर, आपल्या बजेटचा आकडा निश्चित झाल्यावर घरात प्रत्यक्ष राहायला जाण्याचे वेध लागतात. तोपर्यंत प्रत्येक गृहिणी घरातल्या फर्निचरची मांडणी कशी करायची, किचनमध्ये कोणकोणत्या सोयी करून घ्यायच्या, घराच्या खिडक्या, दरवाजे त्यांची पॅनेल्स कशा आकाराचे आणि कोठे असावे यासारख्या गोष्टींचा विचार करू लागते. तद्नंतर एखादा इन्टिरिअर डिझायनर गाठून त्याच्या कल्पनेतील घर आणि आपल्या सोयीसुविधा यांची सांगड घालून आपल्या वास्तूला एक नवे आकर्षक रूप दिले जाते. घराच्या वा बंगल्याच्या सजावटीत फर्निशिंगला एक वेगळेच महत्त्व आहे. आजकाल बाजारात ग्राहकांना आकर्षित करणारी विविध तऱ्हेची उत्पादने आली आहेत. आजच्या लेखात पडद्यांचा विचार करायचा आहे. फर्निशिंग फॅब्रिक हे विशेषत: पडद्यांसाठी उपयुक्त ठरते. कर्टन फॅब्रिक्स हे हॅन्डलूम, सुती सिन्थेटिक, ज्यूट, शनिल, सिल्क, ऑरगन्झी नेट यासारख्या कपडय़ांचे येते. प्रत्येकाचे रेट्स वेगवगेळे आहेत. त्यात सर्वामध्ये आकर्षक रंगही आहेत. तुमच्या घराच्या भितींना साजेसा रंग निवडायचा आणि नंतर खिडक्या पडद्यांनी सजवायच्या. पूर्वी पडदे टेलरकडून शिवून घ्यायची पद्धत होती. आजकाल पडदे रेडिमेडही मिळतात. ‘इन्स्टंट’ च्या जमान्यात आता प्रत्येक वस्तू लवकर मिळवण्याकडे कल वाढला आहे. रेडिमेड कर्टन्स हे सर्वसाधारणपणे दरवाज्यांच्या स्टॅन्डर्ड (प्रमाणित) उंचीचे असतात. म्हणजेच ८४’’ आणि खिडक्यांचे ६०’’ आकारात असतात. यात निरनिराळ्या व्हारायटीज उपलब्ध आहेत. परंपरागत लूप कर्टन्स त्याला लाकडी बटन्स शोसाठी लावलेली असतात. याशिवाय आयलिड कर्टन्ससुद्धा ट्रेन्डी लूकचे असतात आणि नजरेला सुखावह वाटतात. रेडिमेड कर्टन्सच्या रेंजही वेगवेगळ्या आहेत. ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार ते उपलब्ध आहेत.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s