पीओपी : सिलिंगचा लूक बदला हवा तसा

एकदा घेतलेले घर बदलता येत नाही. परंतु त्याची सजावट करून रूप आणि लूक बदलणे आता सहज शक्य झाले आहे. बाजारामध्ये नवनव्या वस्तू आल्या आहेत. त्याचा उपयोग कसा करायचा याचे तंत्रही उपलब्ध आहे. कोणत्याही स्वरुपाची मोडतोड न करताही पीओपीसारख्या साधनाचा वापर करून हॉलचा चेहरामोहरा बदलता येतो.
बदलत्या काळाबरोबर लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. सजावटीच्या तंत्रामध्येही प्रचंड बदल झाले आहेत. त्यासाठी बाजारात नवनवी साधने उपलब्ध झाली आहेत. नव्या तंत्राचे प्रत्येकाला आकर्षण वाटू लागले आहे. बदलत्या संस्कृतीबरोबर नव्याचे स्वागत आणि जुन्याची जपणूक करीत नवी पिढी घराची सजावट करू लागली आहे. घर, कार्यालय, रेस्टॉरंट आदी ठिकाणी सजावटीला प्रचंड महत्त्व

 

प्राप्त झाले आहे. आपले कार्यालय आणि घराचा लूक इतरांपेक्षा वेगळा असला पाहिजे. विशेषत: नवीन सजावटीबरोबर वास्तूचे नूतनीकरण करतानाही अनेक विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. अलीकडच्या काळात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) पीओपीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पीओपीच्या साहाय्याने घराच्या छताचा आणि भिंतीचा एकसारखेपणा आणण्यास मदत होते. पीओपीच्या साहाय्याने छत, भिंती, खांब आदीवर हवे तसे आकर्षक नक्षीकाम करता येते. त्यामध्ये वेगवेगळे रंग भरता येतात. त्यामुळे घराचा लूक बदलण्यास मोठी मदत होत असल्याचा अनुभव सांगितले.
घराची सजावट करताना पूर्वी लाकडी फर्निचर आणि पडद्यांना महत्त्व होते. आता काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदलत आहे त्यामुळे फर्निचर, पडदे बदलण्याबरोबर छत, भिंती आणि खांबही आकर्षक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पीओपीच्या साहाय्याने छताचे रुप बदलणे सोपे झाले आहे. पीओपीच्या साहाय्याने छत बदलले तर घर आणि कार्यालय नक्कीच आकर्षक दिसण्यास मदत होते. त्यामुळे आता कार्यालय आणि घरामध्ये या माध्यमाचा सर्रास वापर केला जात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नामवंत कंपन्या या क्षेत्रात उतरत असल्यामुळे तेथे संगणक अभियंत्यांची मागणी वाढली आहे. त्यांना मिळणाऱ्या मोठय़ा पगारामुळे त्यांच्याकडून आलिशान घरांना मागणी वाढली आहे. त्यामुळे राहणीमान उंचावत आहे. बँका तसेच वित्तसहाय्य करणाऱ्या संस्था पुढे आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होऊ लागली आहे. घराचे स्वप्न पूर्ण होत असताना त्याची सजावट आकर्षक असावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भिंतीबरोबर छताची सजावट कशी असावी, घरातील फर्निचर कसे असावे, भिंतींना रंग कोणता असावा, असे एक ना अनेक गोष्टींचा आवर्जून विचार केला जाऊ लागला आहे. घरातील विजेच्या वायरी तसेच लाईट फिटिंग झाकली जाईल अशा पद्धतीने पीओपीचा वापर केला जातो. पीओपीच्या नक्षीकामावर रंगकाम केले तर ते अधिकच उठून दिसते.
भिंतींना आणि स्लॅबला पीओपीचा वापर करून एकसारखेपणा आणता येतो. तसेच हवी तशी सजावट करणे शक्य होत आहे, असा अनेकांचा अनुभव आहे. आपल्या आवडीनुसार तसेच बजेटनुसार पीओपी करता येत असल्याचे या व्यवसायातील कारागिरांनी सांगितले.
नव्याने सदनिका तयार करताना आता सर्वच बांधकाम व्यावसायिक पीओपीचा वापर करत आहेत. त्यामुळे पुन्हा त्याचा वापर करून सजावट करण्यासाठीचा वेळ आणि पैसाही वाचत असल्याचे  सांगितले. स्लॅब आणि फॉलसीलिंगमध्ये १० ते १२ इंचाचे अंतर असते. त्यामध्ये थर्माकोलची शीट्स वापरली जातात. या थर्माकोलमुळे उष्णतेचे प्रमाण रोखले जात असल्याचा अनुभव .
पीओपीमुळे भिंतींना आणि स्लॅबला एकसारखेपणा येतो. त्यामुळे रंगकाम सफाईदारपणे करता येते. प्लॅस्टरऐवजी आता अनेक बांधकाम व्यावसायिक पीओपीचा वापर करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सनला आणि सिमेंट यांची बचत होते. पीओपीच्या सजावटीत फॉलसिलिंग केले जाते. त्यामुळे सर्व वायरिंग झाकले जाऊन आकर्षकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे दिवेही या रचनेत बसवता येतात. घरामध्ये ‘मूड लाईटिंग’ करता येते. पूर्वी पीओपीचा वापर फक्त उंची हॉटेल आणि मोठय़ा कार्यालयामध्ये सजावटीसाठी केला जात असे. आता काळ बदलला आहे, नव्या घर आणि कार्यालयांबरोबर जुन्या घराचे रूप बदलण्यासाठी पीओपीचा वापर केला जात आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s