स्थितप्रज्ञ रंग

दगड, लाकूड, नारळाचा कीस अशा नैसर्गिक वस्तूंचे जे रंग आहेत, ते ‘न्यूट्रल कलर्स’ या रंग प्रकारात मोडतात. ते रंग थंडावाही देत नाहीत किंवा उष्ण रंगही नाहीत. त्यामुळेच त्यांना ‘न्यूट्रल कलर्स’ असं म्हटलं जातं. पण हे रंग स्थितप्रज्ञ असले, तरी ते निष्क्रिय मात्र नाहीत. या रंगांमध्ये रंगवलेल्या खोल्या आकाराने मोठय़ा वाटतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे लहान खोल्यांमध्ये मोठेपणाचा आभास निर्माण करायचं महत्त्वाचं काम ते करतात. या रंगांमुळे मनाला स्थिरता आणि शांतता प्राप्त होते. त्यामुळे घरातल्या सर्वच खोल्यांमध्ये हे रंग उपयोगात आणता येतात. मात्र बेडरूम, डायनिंगरूम किंवा विशेषत: किचनमध्ये ते अधिक प्रभावी ठरतात. ज्या खोलीत धावपळ, दगदग असते, अशा खोलीत जर हे रंग उपयोगात आणले, तर त्या तशाही धावपळीच्या स्थितीत मन गोंधळून न जाता शांतपणे कामं पार पाडता येतात. सध्याच्या काळात

 

घरच्या जबाबदाऱ्यांबरोबरच नोकरी-उद्योगांमध्येही महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा परिस्थितीत घरातलं उरकून बाहेर जाताना, त्यांचा बराचसा वेळ हा किचनमध्ये, आणि तोही धावपळीत, दगदगीत जातो. त्यामुळे किचनसाठी या न्यूट्रल कलर्सचा वापर अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. ब्राऊन, क्रीम किंवा मातकट रंगांचा त्यासाठी वापर करता येईल. क्रीम कलर्सच्या भिंतीच्या पाश्र्वभूमीवर लालसर ग्रॅनाईटमधला ओटा आणि त्याखाली लाइट ब्राऊन रंगाची सनमायका असलेल्या ट्रॉलीज किचनला शांत पण ‘रिच लूक’ मिळवून द्यायला मदत करतात.
टॉयलेटसाठीही काही वेळा या कलर स्कीमचा वापर केला जातो. लिव्हिंगरूमसाठीही या रंगांचा वापर करता येऊ शकतो. एकदम फिक्कट ब्राऊन रंगाच्या भिंती, त्याच रंगाचं फ्लोअरिंग आणि त्याला शोभतील अशी सोफ्याची कव्हरं. अशा प्रकारच्या खोल्यांमध्ये दिसायला साधेपणा असतो. त्यामुळे अशा खोल्यांसाठी प्रकाशयोजना करताना ‘हायटेक’ प्रकाशयोजना करू नये. एखादा स्टँडवरचा म्हणजेच पोस्टलँप या खोल्यांमध्ये लावता येईल. दिव्याची शेडही पेपरपासून तयार केलेली अशी निवडली, तर एकंदरच खोलीचा साधेपणा जपला जाईल.
न्यूट्रल कलर्सच्या या रंगांच्या कुटुंबातले रंग एकमेकांशी मिळतंजुळतं घेणारे आहेत. त्यामुळे खोलीसाठी कलर स्कीम निवडताना डोक्याला फार ताण द्यावा लागत नाही. पण केवळ न्यूट्रल कलरमधल्या खोल्या कंटाळवाण्या होऊ नयेत यासाठी त्यात इतर रंगांचा वापर केला तर त्यांना उठावदारपणा येतो. त्यामुळे पॉलिश केलेल्या लाकडी स्टँडवर जर गडद निळ्या रंगातील एखादी काचेची बाऊल किंवा हिरव्या रंगातली झाडं ठेवली किंवा पॉलिश केलेल्या टेबलखाली हिरव्या-निळ्या रंगातला गालिचा घातला, तर त्या खोलीला एक वेगळा ‘लूक’ यायला मदत होते.
विविध रंगांचं असं हे एकमेकांशी असलेलं नातं आजवर या सदरातून आपण पाहिलं. आपल्या घरासाठी रंगांची निवड करताना आपण आपल्या आवडीनिवडींबरोबरच विशिष्ट रंगांबाबत आपल्या मनात काय भावभावना आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. केवळ एखाद्याच्या घरी अमुकएक कलर स्कीम निवडली आहे म्हणून आपल्या घरी तीच निवडायचा निर्णय घेऊ नका. खोलीतला नैसर्गिक प्रकाशही विचारात घ्या आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे घर हे घरासारखं वाटणं महत्त्वाचं आहे. त्याला एखाद्या हॉटेलचा लूक येता कामा नये. तसंच ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं असणं गरजेचं आहे. यासाठी योग्य रंगांची निवड जर आपण केली. तर रंगांमुळे मनावर योग्य ते परिणाम होऊन घरात सुखदायी वातावरण निर्माण व्हायला हे रंग मदत करू शकतील.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s