इंटीरिअर डिझायिनग-वास्तुसजावटीचा मंत्र

वास्तू, मग ते घर असो किंवा कार्यालय; ते सुंदर दिसावं यासाठी इंटीरिअर डिझायिनग हा महत्त्वाचा टप्पा आहे. तरीसुद्धा अनेकांच्या मनात इंटीरिअर डिझायिनग का करावं, त्याची गरज काय, कुशल इंटीरिअर डिझायनर का निवडावा याविषयी एक किंतू असतो. तुमच्या वास्तूच्या अंतर्गत सजावटीला एक नियोजनबद्धतेची जोड असावी असं वाटत असेल, तर इंटीरिअर डिझायिनग करून घेणं गरजेचं आहे. नियोजनबद्ध म्हणजे काय तर आपल्या गरजा, आवडीनिवडी, आपली वास्तू मला कशी सजवलेली बघायला आवडेल याविषयीच्या कल्पना इत्यादींची अभ्यासपूर्ण आखणी.
अनेकजण आपल्या मनाप्रमाणे घरात फíनचर, बाजारात आवडलेल्या वस्तूंनी घर सजवतात. पण अशी सजावट आकर्षक, एकसंध दिसत नाही. रंगछटा वेगवेगळ्या होतात. हॉलच्या आकारमानापेक्षा सोफा, इतर फíनचर बोजड दिसतं. हॉलची जागा अशा बोजड वस्तूंनी व्यापली जाते. यामुळे वावरण्यासाठी जागाच मिळत नाही. तीच गोष्ट बेडरूमची! इथे बेड, कपाटं, मुलांचं स्टडी टेबल याची इतकी गर्दी होते की, ही बेडरूम स्टोअरेज रूम दिसायला लागतं. पडद्यांचे रंग, िभतीचे रंग इतके विसंगत होतात की, त्या रूमचा लुकच बदलून जातो. असं होऊ नये यासाठी या शास्त्राचं ज्ञान असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण आखणी करून अंतर्गत सजावट करावी.
घराच्या संदर्भात विचार केला तर हल्ली अनेक विकासक घरं बांधताना काही सोयीसुविधा देतात. जसे की, मॉड्युलर किचन, वॉर्डरोब, बेड इत्यादी. पण या सर्व गोष्टी देताना तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या गरजांचा र्सवकष विचार अंतर्भूत नसतो. एक सरधोपट डिझायिनग ते करून देतात. म्हणूनच असं सेमी फíनश्ड घर घेण्यापेक्षा रॉ फ्लॅट घ्यावा. म्हणजे आपल्याला आपल्या आवडीनुसार, गरजांनुसार मनाप्रमाणे घर सजवता येतं.
इंटीरिअर डिझायिनगमध्ये महत्त्वाचे दोन भाग आहेत. १ रचना , २ सजावट . यातील रचना किंवा प्लॅिनग हा भाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सजावटीची रचना आखताना खालील गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
१. वास्तूचं स्वरूप, म्हणजे घर आहे की कार्यालय, बुटिक, ब्युटी सलोन, क्लिनिक इत्यादी.
२. वास्तूची जागा (एरिया).
३. घर असेल तर त्या घरातील लोकांची संख्या आणि त्यांचा घरातला वावर. घराप्रमाणेच कार्यालयातल्या व्यक्ती, कोणत्या स्वरूपाचं काम तिथे चालणार आहे, अशा गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.
४. डिझायिनगसाठीचं बजेट हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. कारण यावर इंटीरिअर किती दर्जेदार, टिकाऊ, आकर्षक करता येईल, हे ठरत असतं.
५. ग्राहकाच्या गरजा, त्यांची जीवनशैली, त्यांच्या आवडीनिवडी व त्यांच्या सवयी, व्यवसाय.
६. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरिअलचा ताळमेळ.
७. मटेरिअलचे रंग, टेश्चर व प्रकाशयोजना.
सजावटीमध्ये रंगसंगती, पडदे, चादरी, कुशन्स, दरीज, गालिचे, विविध शोभेच्या वस्तू उदा. फ्लॉवर पॉट्स, कलाकुसर, फ्रेम्स यांचा समावेश असतो.
वास्तूमध्ये काम सुरू करताना अनेक गोष्टी बघाव्या लागतात. सिव्हिल वर्क करून घ्यायचे आहे का, कुठे खूपच आवश्यक अशी तोडफोड करावी लागणार आहे का किंवा फक्त कारपेंट्री वर्कच करावं लागणार आहे? काम कसंही असो ते एकाच वेळेस करून घ्यावे. कारण असं केल्यानं कामात एकसूत्रता राहाते. सजावट सौंदर्यपूर्ण व अर्थपूर्ण होऊन पशाची बचतही होते. ही सगळी कामं वेगवेगळ्या व्यक्तींकडून करून घेण्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तींमार्फत करून घ्यावी. इंटीरिअर डिझायनर हा क्लायंट आणि कॉन्ट्रॅक्टर्स, वर्कर्स यामधील दुवा असतो. आपलं बजेट, गरजा (रिक्वायरमेंट्स), आपल्या कल्पनेतील वास्तू या सगळ्याविषयी इंटीरिअर डिझायनरशी मोकळेपणाने चर्चा करावी. मुळात कुशल डिझायनरसुद्धा प्रथम तुमच्याकडून याच गोष्टी जाणून घेतो. असं केल्यानं त्याला रचना व सजावट करणं अधिक सोयीचं होतं. तुमच्या वास्तूच्या सजावटीला तो अधिक चांगल्याप्रकारे न्याय देऊ शकतो. डिझायनरबरोबर चच्रेला बसण्याअगोदर घरातल्या व्यक्तींशी तुमची चर्चा होणं आवश्यक आहे. नंतर तुम्ही डिझायनरशी चच्रेला बसावं. घरातल्या व्यक्तींनी आधी आपापसात चर्चा केलेली असल्याने डिझायनरला तुम्ही तुमची मतं, मनातलं वास्तू विषयीचं चित्र, तुमच्या गरजा या सर्व गोष्टी कमी वेळेत ठळकपणे मांडू शकता. ही पायरी झाल्यानंतर बजेटविषयी डिझायनरला पूर्ण कल्पना द्यावी. इथे आणखी एक मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो की, प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर बजेटच्या बाबतीत कमी-जास्त होत असतं. डिझायनर याची तुम्हाला आधीच कल्पनाही देतो. कामात अनेक अडचणीसुद्धा येत असतात. अशावेळी तिथल्या तिथे निर्णय घ्यावे लागतात. त्या अनुषंगाने रचनेमध्ये बदल होतात. अर्थात याची संबंधितांना पूर्ण कल्पना दिली जाते. या सगळ्याचा विचार करून देखणं इंटीरिअर करून घ्यावं.
http://www.designaddict.us

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s